कल्याण शीळ महामार्गावरील देसाई खाडी ते काटई उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी १८ ऑगस्ट या दिवशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या उड्डाणपुलाचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून रेल्वेकडूनही पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करत उड्डाणपुलाची एक मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत, तर दुसरी मार्गिका फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. कल्याण शीळ महामार्ग हा कल्याण, डोंबिवली आणि त्यापुढील शहरांना ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून पलावा जंक्शनवरील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्ताप होत होता. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर कल्याण शीळ मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
(हेही वाचा – Bank : कर्जाचा हप्ता भरण्यास विलंब झाला तर बँक दंड आकारणार का?)
या बैठकीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड, एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता राजेश पाटील, कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community