Srikanth Shinde वारकरी बांधवांसह विठू नामाच्या जयघोषात झाले दंग !

तरडगाव ते फलटण या मार्गावर वारीत घेतला सहभाग, संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे घेतले दर्शन.

88
Srikanth Shinde वारकरी बांधवांसह विठू नामाच्या जयघोषात झाले दंग !

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (Srikanth Shinde) यांनी बुधवारी (१० जुलै) तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला. तसेच ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला. (Srikanth Shinde)

राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून विठू रखुमाईच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यातील संत तुकोबा माऊलींची, संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी मार्गात हजारो वारकरी एकत्र येऊन पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करत असता. महाराष्ट्राला लाभलेल्या या वारीच्या परंपरेत अनेक मान्यवर मंडळी देखील आवर्जून सहभाग होत असतात. गेल्या वर्षी प्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदा देखील या वारीत सहभाग घेतला. खासदार डॉ. शिंदे (Srikanth Shinde) यांनी यांनी बुधवारी तरडगाव ते फलटण या मार्गावर श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला. तसेच ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. (Srikanth Shinde)

(हेही वाचा – मविआचे मराठा प्रेम पुतना मावशीप्रमाणे; Pravin Darekar यांचे टिकास्त्र)

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Srikanth Shinde) यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांदयावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा वारकऱ्यांसाठी अनेक उपायोजना राबविल्या आहेत. विशेष दिंड्यांना आर्थिक साहाय्य, वारकऱ्यांसाठी आरोग्य विमा, दिंड्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोफत औषधोपचार यांसारख्या उपायोजना राबविण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे यंदाची वारी ही आनंदाची वारी ठरली असल्याचे मत यावेळी वारकरी बांधवांनी व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला. (Srikanth Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.