शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्रातील खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील मुघल बादशाह औरंगजेबाची कबर जमीनदोस्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी दि. १४ मार्च रोजी लोकसभेत ही मागणी केली आहे. सभागृहाच्या शून्य प्रहरात म्हस्के (MP Naresh Mhaske) यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, “भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या एकूण ३,६९१ स्मारके व कबरींपैकी २५ टक्के वास्तू या मुघल व ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावाने उभारलेल्या आहेत. या लोकांनी भारत देश, या देशाची संस्कृती व परंपरेविरोधात कामं केली आहेत.औरंगजेबाची (Aurangzeb) कबर ही त्यापैकी एक आहे.”
( हेही वाचा : Holi 2025 : धुलीवंदनासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करा, होळीत टायर, प्लास्टिक जाळू नका; आयुक्तांचे आवाहन)
पुढे म्हस्के म्हणाले की, ज्या औरंगजेबाने (Aurangzeb) अत्यंत क्रूरपणे छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj ) हत्या केली, हिंदूंची मंदिरे पाडली. या मंदिरांमधील संपत्ती लुटली. तसेच शिखांच्या नवव्या व दहाव्या धर्मगुरूंची हत्या केली. त्याच औरंगजेबाची कबर खुलताबादमध्ये असून एएसआयने ती संरक्षित व संवर्धित केली आहे. औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची गरज काय? औरंगजेबासह भारताविरोधात कामे केलेल्या सर्वांची स्मारके व कबरी नष्ट करायला हव्यात, अशी मागणी नरेश म्हस्के (MP Naresh Mhaske) यांनी केली.
दरम्यान मध्यांतरी औरंगजेबामुळे (Aurangzeb) राजकारण तापलं होतं. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी ‘औरंगजेब क्रूर शासक नव्हता’, असे विधान केले होते. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अनादर केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आझमींचे अधिवेशन कालावधीपर्यंत विधानसभेतून निलंबन करण्यात आले होते. त्यातच नरेश म्हस्के (MP Naresh Mhaske) यांनी लोकसभेत औरंगजेबाची कबर नष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community