मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीनिमित्त गावकऱ्यांनी गावात गणगौर मातेच्या मूर्तीची स्थापना केली होती. नवरात्रीनंतर गणगौर मातेच्या मूर्तीचे विसर्जन करायचे होते. त्यामुळे आज विहिरीची स्वच्छता करण्याचा विचार ग्रामस्थांनी केला. विहीर स्वच्छ करण्यासाठी काहीजण उतरले होते. पहिले तीन जण गाळात बुडाले, त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य पाच जणांचाही बुडून मृत्यू झाला. (MP News)
हा प्रकार पाहून ग्रामस्थांनी तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच छायगावमाखान पोलीस ठाण्यासह रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जिल्हाधिकारी ऋषव गुप्ता, एसपी मनोज कुमार राय, एसडीएम बजरंग बहादूर सिंहही घटनास्थळी पोहोचले. पोलिस-प्रशासनाच्या पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. विहिरीत दलदल आणि कचऱ्यामुळे तयार झालेल्या विषारी वायूमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (MP News)
हेही वाचा- Supreme Court चे सर्व न्यायमूर्ती मालमत्तेचा तपशील सार्वजनिक करणार
या अपघातात राकेश (21), वासुदेव (40), अर्जुन (35), गजानन (35), मोहन(माजी सरपंच, 48), अजय (25), शरण (37) आणि अनिल (25) यांचा मृत्यू झाला. खंडवाचे जिल्हाधिकारी ऋषभ गुप्ता यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आणि सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. (MP News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community