- प्रतिनिधी
मुंबईच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असून त्यामुळे येथील पायाभूत सुविधेवर याचा ताण पडत आहे. मुंबईतील पाणी पुरवठ्याच्या मागणीत वाढ होत असून सध्या व भविष्यातील पाण्याची (Water) मागणी पूर्ण करण्यासाठी गारगाई व पिंजळ प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, असे निवेदन मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन दिले.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून येथे महानगरपालिका आहे. असे असतांनाही मुंबईत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. सध्या मुंबई शहराला दररोज ४२०० मिलियन लिटर पाण्याची आवशक्यता आहे. प्रत्यक्ष पुरवठा मात्र ३८०० मिलियन लिटर होत असल्यामुळे ४०० मिलियन लिटर पाण्याची (Water) कमतरता भासत आहे. मुंबईच्या लोकसंख्येत तसेच टोलेजंग इमारती यांच्या संख्येत दरदिवशी वाढ होत आहे.
(हेही वाचा – Border – Gavaskar Test, Melbourne Test : मेलबर्न विमानतळावर विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन पत्रकारादरम्यान नेमकं काय घडलं?)
२०१४ नंतर पाणीपुरवठा योजनेत सुधारणा करण्यात झाली आहे. ३४०० मिलियन लिटर पाणी पुरवठ्यावरून ३७५० मिलियन लिटर पाणी पुरवठ्यात वाढ झाली. २०१८ मध्ये ३८५० मिलियन लिटर तर २०२३ मध्ये ४२०० मिलियन लिटर पाणी पुरवठ्याच्या मागणीत वाढ झाली आहे. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की २०३१ पर्यंत मुंबईच्या पाणी पुरवठ्याच्या मागणीत ५३२० मिलियन लिटर आणि २०४१ पर्यंत ६४२४ मिलियन लिटर पाण्याची (Water) गरज भासणार आहे.
भविष्यातील मुंबईतील पाण्याची (Water) वाढती गरज लक्षात घेता मुंबई महापालिकेन गारगाई व पिंजाळ या प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. हे प्रकल्प पुर्ण झाल्यावर अनुक्रमे ४४० मिलियन लिटर आणि ८६५ मिलियन लिटर अतिरिक्त पाण्याची मागणी पूर्ण करणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारने पायाभूत सुविधेसाठी ११ लाख ११ हजार १११ कोटीची तरतूद केली आहे. मुंबईतील वाढती पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी या निधीतून गारगाई व पिंजाळ प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच दमणगंगा घाटीतून पाणी आणण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, असे निवेदन खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांना दिले.
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=M6qk2bOxaPk
Join Our WhatsApp Community