मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील शाहपूर गावात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू (MP wall collapses) झाल्याची घटना घडली आहे. तर चार मुले गंभीर जखमी असून त्यांची परिस्थिती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. श्रावण सुरू होत असल्यामुळे शाहपूर गावातील हरदयाल मंदिरात शिवलिंग बनवित असताना ही दुर्घटना घडली.
(हेही वाचा –Pune Rain : पुण्यातील पुरस्थितीवर मुख्यमंत्र्यांचे स्थलांतरणाचे आदेश!)
सागर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक आर्य यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे जीर्ण घराची भिंत कोसळून अपघात घडला. ही भिंत ५० वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते. रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे अनेक लहान मुले शिवलिंग तयार करण्यासाठी येथे जमले होते. त्याचवेळेस भिंत कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखालून मुलांना बाहेर काढण्यासाठी बुलडोजर आणावे लागले. (MP wall collapses)
(हेही वाचा –हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे Middle Vaitarna Dam देखील पूर्ण भरले यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण भरलेला पाचवा तलाव)
भिंत कोसळली तेव्हा लहान मुले मंदिराच्या शेजारी असलेल्या तंबूमध्ये बसले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिंत जीर्ण झाली होती. आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास सदर दुर्घटना घडली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली नऊ मुलांचा मृत्यू झाला आहे. (MP wall collapses)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community