MPSC Results : निकाल जाहीर, प्रमोद चौगुले पहिला

118

एमपीएससी राज्यसेवा २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. प्रमोद चौगुले हा ६३३ मार्कांसह राज्यात पहिला आला आहे, तर शुभम पाटीलला ६१६ मार्क मिळाले आहेत. शुभम पाटील दुसरा आला आहे. मुलींमध्ये सोनाली मेत्रे पहिली आहे, तर ओव्हरऑल सोनालीला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार सह २० पदांच्या ४०५ जागांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या निकालाची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता ३ मार्च २०२३ ते १० मार्च २०२३ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे.

(हेही वाचा आसाममध्ये हिंदूंच्या घरवापसीला वेग; ११ कुटुंबातील ४३ जणांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.