MPSCने मुलाखतीच्या दिवशीच केला निकाल जाहीर! कारण काय?

139

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक अशा एकूण 34 पदांच्या मुलाखती आयोगाने घेतल्या असून या पदांच्या मुलाखती ज्या दिवशी पार पाडल्या त्याच दिवशी आयोगाने संबंधित पदाचे निकाल देखील प्रसिद्ध केले आहेत. या अतिविशेषीकृत पदे जी अनेक वर्षांपासून रिक्त होती, ती आयोगाने विशेष मोहीम राबवून भरली आहेत.

(हेही वाचा भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानात जिथे कोसळले, तिथे काय घडले?)

एकूण 34 पदांच्या मुलाखती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मज्जातंतूशास्त्र, नवजात शिशुरोगशास्त्र, अंतस्त्रावी विकारशास्त्र, जठारांत्रजन्यशास्त्र, वृक्क विकारशास्त्र, हृदयवाहीका आणि उरोविकृती शल्यचिकित्साशास्त्र (C.V.T.S.), बालरोग शल्यचिकित्साशास्त्र, मुत्रविकारशास्त्र, सुघटन शल्यचिकित्साशास्त्र, हृदयरोग चिकित्साशास्त्र, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, उपसंचालक आरोग्य सेवा, औषध वैद्यकशास्त्र, मंजातंतू शल्यचिकित्साशास्त्र, अतिविशेषीकृत विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक अशा एकूण 34 पदांच्या मुलाखती आयोगाने घेतल्या असून या पदांच्या मुलाखती ज्या दिवशी पार पाडल्या त्याच दिवशी आयोगाने संबंधीत पदाचे निकाल देखील प्रसिद्ध केले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.