MPSC Exam 2022: सरकारी पदभरती मध्ये मोठी वाढ, 340 नव्या जागांसाठी होणार भरती

85

एमपीएससीमधून विविध सेवांसाठी करण्यात येणा-या भरती प्रक्रियेत आता वाढ करण्यात आली आहे. आता 340 नव्या जागांसाठी एमपीएससीद्वारे भरती प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे.

11 मे 2022 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एमपीएससी)द्वारे 161 पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्येच आता 340 नव्या पदांची भरती होणार असल्यामुळे आता 501 जागांवर भरती होणार आहे. एमपीएससी आयोगाद्वारे ट्वीट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा देणा-या उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे.

या नव्या जागांवर भरती

(1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33
(2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41
(3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47
(4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14
(5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2
(6) शिक्षणाधिकारी, गट अ-20
(7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6
(8) तहसीलदार, गट अ-25
(9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80
(10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3
(11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2
(12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25
(13) सहायक प्रकल्प अधिकारी, गट ब-42

राज्यसेवा पूर्व परीक्षा

दरम्यान, एमपीएससीमार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 21 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेद्वारे राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.