एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या!

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने 11 एप्रिल रोजी होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी सर्व राजकीय पक्षांच्या स्तरातून होवू लागली.  त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने  शुक्रवारी, ९ एप्रिल रोजी बैठक घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. घेण्यात आली होती.  

राज्यातील वाढत्या कोरोनाचा परिणाम सर्वच शैक्षणिक क्षेत्रावर आणि त्यांच्या परीक्षांवर झालेला आहे. त्याचाच आणखी एक परिणाम राज्याच्या एमपीएससी परीक्षेवर झाला आहे. याआधी या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत, म्हणून ज्या राजकीय पक्षांनी विरोध करून परीक्षांच्या तारखा जाहीर करायला सरकारवर दबाव टाकला होता, आता त्याच राजकीय पक्षांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार राज्य सरकराने ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्र्यांनी तातडीने घेतली बैठक!

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने 11 एप्रिल रोजी होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी सर्व राजकीय पक्षांच्या स्तरातून होवू लागली.  त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने शुक्रवारी, ९ एप्रिल रोजी बैठक घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री वळसे-पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत ही बैठक पार पडली. त्यामध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

(हेही वाचा : विकेंड लॉकडाऊन: काय सुरू, काय बंद? वाचा आणि कन्फ्यूजन दूर करा!)

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी परीक्षा पुढे ढकलण्याची केलेली मागणी!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी म्हणजेच 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार होती. परंतु या परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट आले होते. कालपर्यंत या परीक्षेबाबत सरकारकडून एमपीएससी प्रशासनाला कोणतीही सूचना मिळालेली नव्हती. त्यातच राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावले, शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे ही परीक्षा 11 एप्रिलला होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यासंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत चर्चा केली. दरम्यान याबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.

पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते!

दरम्यान मागील महिन्यातच एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. त्यानंतर भाजप, दोन्ही काँग्रेस, मनसे या सर्वच पक्षांनी या विद्यार्थ्यांची बाजू घेतली होती. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलल्याचे चित्र निर्माण झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here