महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ राज्यभरातील केंद्रांवर पार पडली. (MPSC Exam) या परीक्षेतील दोन प्रश्न आणि त्यासाठी दिलेले पर्याय चर्चेत आले आहेत. तुमचे मित्र तुम्हाला मद्यपान (drinking alcohol) करण्यास प्रभावित करत असतील, तर तुम्ही काय कराल, याशिवाय तुम्हाला मूतखड्याच्या वेदनांना सामोरे जावे लागले तर काय कराल, असे प्रश्न एमपीएससीच्या परीक्षेत विचारण्यात आले होते.
(हेही वाचा – लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद विरोधात हिंदूंनी एकत्र या; भाजपा नेते T.Raja Singh यांचे आवाहन)
प्रश्न – तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल, तर तुम्ही काय कराल?
उत्तराचे पर्याय
१) मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे.
२) दारू पिण्यास नकार देईन.
३) फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन.
४) नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे.
या प्रश्नातून भावी पिढीला दारूपासून दूर ठेवण्याचा सरकारचा विचार दिसत असला, तरी त्यामुळे ही परीक्षा चर्चेत आली आहे. (MPSC Exam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community