महाराष्ट्र लोकसेवा दुय्यमी सेवा राजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या पूर्व परीक्षेतील काही प्रश्न वगळण्यात आले. त्यामुळे नाराज विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका टॉकीज चौक येथे आंदोलन सुरु केले. वाद मिटवून भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
काय आहे विद्यार्थ्यांचे म्हणणे?
विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने एमपीएससीच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर पुन्हा 17 फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून गेल्या दोन महिन्यांत यावर एकही सुनावणी झाली नाही. पुढील महिन्यापासून न्यायालयाला सुट्ट्या लागणार आहे. त्यामुळे बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. सरकारने महाधिवक्ता यांच्यामार्फत उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करून परीक्षेचा प्रश्न सोडवावा. आयोगाने जे प्रश्न बरोबर होते ते बरोबर द्यावेत व फेरनिकाल लावून परीक्षा लवकरात लवकर घ्यावी ही काही विद्यार्थ्यांची मागणी आहे. एमपीएससीच्या पद्धतीनुसार दोन उत्तरतालिका अपेक्षित असताना आयोगाने तिसरी उत्तरतालिका प्रसिद्ध केली आहे. यावेळी काही प्रश्न रद्द तर काही प्रश्न थेट वगळण्यात आले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे गुण कमी झाल्याने यावर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी प्रश्न बरोबर असताना ते रद्द करू नयेत, अशी मागणी केली आहे.
(हेही वाचा पेन्शनधारकांचा चेहराच ठरणार आता हयातीचा दाखला!)
Join Our WhatsApp Community