MPSC चा अंतिम निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

180
MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली; होणार 'या' तारखेला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ७ ते ९ मे २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ चा अंतिम निकाल गुरुवार, १५ जून रोजी जाहीर करण्यात आला. आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ४०५ पदांकरीता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

यापरीक्षेमध्ये चौगुले प्रमोद बाळासाहेब हे राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून म्हात्रे सोनाली अर्जुनराव या महिलांमधून तसेच यादव विशाल महादेव हे मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत. निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका, उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली.

(हेही वाचा Veer Savarkar : कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा हिंदुद्वेष; सत्तेत येताच वीर सावरकरांवरील धडा अभ्यासक्रमातून वगळला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.