MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच MPSC मार्फत ८०० जागांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, ही पूर्व परीक्षा दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.
( हेही वाचा : New Labour Code : १ जुलैपासून नवे कामगार कायदे! खासगी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक सुट्ट्यांमध्येही होणार मोठा बदल )
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील 800 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षा दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येईल. https://t.co/I6U0WqO7xK
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 23, 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक पदांच्या एकूण ८०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२२ आहे.
अटी व नियम
- परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२
- पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक
- पद संख्या – ८०० जागा
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – २५ जून २०२२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जुलै २०२२
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या रचनेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता CSAT चा पेपर हा अर्हता प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. या पेपरमध्ये ३३ टक्के गुण प्राप्त उमेदवारांचे पेपर क्रमांक एकमधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
Join Our WhatsApp Community