विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! MPSC नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

MPSC विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. MPSC चा नवा पॅटर्न हा २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिंदे सरकारने तत्वत: मंजुरी दिली आहे.

( हेही वाचा : देशभरातील रस्त्यांवरून गायब होणार ९ लाख सरकारी वाहने! काय आहे कारण? )

नवा अभ्यासक्रम हा २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विद्यार्थ्यांच्यावतीने केली. त्यामुळे कॅबिनेट बैठकीच्या दरम्यान आम्ही यावर चर्चा करून २०२५ पासून अभ्यासक्रम लागू करू अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. कॅबिनेट बैठक झाल्यावर मुख्यमंत्री घोषणा करतील अशी माहितीही त्यांनी दिली आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतील असे आश्वासन देण्यात आले आहे.

नवा अभ्यासक्रम २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू 

MPSC परीक्षेत आयोगाकडून करण्यात आलेले बदल हे २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावेत या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले होते. पुण्यातील अल्का टॉकिज चौकात MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे साष्टांग दंडवत आंदोलन सुरू होते या सर्व विद्यार्थ्यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here