मेगाब्लॉकचे कारण चालणार नाही! परीक्षास्थळी वेळेतच पोहोचा; MPSC ची विशेष सूचना

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक नगररचनाकार गट-ब, श्रेणी १ ची परीक्षा रविवार २० नोव्हेंबरची आयोजित करण्यात आलेली आहे. परंतु १९ व २० नोव्हेंबरला मुंबईत कर्नाक पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे येत्या रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची निश्चितपणे गैरसोय होणार आहे.

( हेही वाचा : मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा! रेल्वे गाड्या सोमवारपर्यंत रद्द)

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ने या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबर रोजी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना प्रसिद्ध केली आहे. परीक्षास्थळी वेळेत पोहोचावे असे या प्रसिद्धपत्रकात MPSC ने नमूद केले आहे.

MPSC ने केली विद्यार्थ्यांना विशेष सूचना :

  • २० नोव्हेंबरला विषयांकित परीक्षा मुंबईसह अमरावती, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे.
  • मुंबईत मेगाब्लॉक असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे उमेदवारांनी परीक्षेकरता निश्चित केलेल्या वेळेपूर्वी संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित रहावे असे MPSC ने प्रसिद्धपत्रकात नमूद केले आहे.
  • परीक्षा उपकेंद्रावर शेवटच्या प्रवेशासाठी निश्चित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही, असे MPSC ने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here