एमपीएससीच्या जागांची लवकरच भरती होणार! मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात एमपीएससी पदांच्या रिक्त जागांचा प्रश्न प्रलंबित असताना ही भरती करण्यावर राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानुसार सर्व कायदेशीर कारवाई लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, लवकरच ही पदे भरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कायदेशीर कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश

राज्यातील एमपीएससी रिक्त पदे भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देश देण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यानंतर या जागांच्या जाहिराती जाहीर केल्या जातील, अशी माहितीही अजितदादा पवार यांनी माध्यमांसमोर मांडली.

(हेही वाचाः सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा घेण्यास शासनाकडून मुदतवाढ)

विद्यार्थ्यांना दिलासा

कोरोना लाटेमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वारंवार परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सैनिक भरतीही सुरू होणार

यासोबतच देशातील प्रत्येक राज्यात सैनिक भरती होत असते. मात्र कोरोना संक्रमणामुळे महाराष्ट्रात ही सैनिक भरती मागील काळात झालेली नाही. राज्यात त्यामुळे ही सैनिक भरती संपूर्ण नियमांचे पालन करुन घेण्यात यावी. तसेच राज्यात कुठेही सैनिक भरती असल्यास त्याची संधी मुला-मुलींना मिळण्यात यावी, अशा सूचना राज्य सरकारने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

(हेही वाचाः सोसायट्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमाव्यात… महिला सुरक्षेसाठी पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here