गोंधळानंतर अखेर एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवशी होणार पूर्व परीक्षा!

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे असून, पूर्व परीक्षा 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून प्रतिक्षेत असेलेली एमपीएससीची जाहीरात प्रसिध्द झाली आहे. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससीची एकही जाहीरात प्रसिद्ध झाली नव्हती. मात्र, आता एमपीएससीने वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यसेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार आहे. परीक्षेच्या तीन महिने आधी एमपीएससीने वेळापत्रक जाहीर केले आहे. आता एमपीएससीनं 2021 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे असून, पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

2021 च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

(हेही वाचा : ‘त्या’ ऑडिओ क्लिपमुळे मुख्यमंत्री संतप्त, रामदास भाईंवर कारवाई करणार?)

कॅबिनेटमध्ये घेतला निर्णय

दरम्यान २३ सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत एमपीएससीच्या जागा भरण्याचा निर्णय घेतला होता. तसेच राज्यातील एमपीएससी रिक्त पदे भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देश देण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यानंतर या जागांच्या जाहिराती जाहीर केल्या जातील, अशी माहितीही अजित पवार यांनी माध्यमांसमोर मांडली होती.

डेडलाईन संपल्याने अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

MPSC मार्फत भरती करण्यासाठी राज्य सरकारने सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्यास सांगितले होते. मात्र राज्य सरकारच्या 43 विभागांपैकी केवळ 10 विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे माहिती जमा केल्याचे समोर आले होते. यामुळे आता इतर विभागांची माहिती जमा करण्यासाठी धावपळ सुरु झाली होती. दरम्यान एमपीएससीकडे माहिती देणाऱ्या विभागांमध्ये पोलिस, महसूल, राज्य उत्पादन शुल्क, कामगार, वित्त व लेखा, परिवहन, शिक्षण, कौशल्य विकास, वनसेवा, मंत्रालय या विभागांचा समावेश आहे. तर बाकीच्या विभागांची माहिती जमा करण्यासाठी धावपळ सुरु झाली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here