सरकारी अधिकारी व्हायचंय? MPSC मार्फत रिक्त पदांची भरती ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार

119

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता (महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2022) पदांच्या एकूण 378 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 3 ऑक्टोबर 2022 आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022 आहे.

( हेही वाचा : माथेरान मिनी ट्रेन पुन्हा धावणार! रेल्वेकडून दुरूस्तीची कामे पूर्ण, चाचणी सुरू)

अटी व नियम 

  • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2022
  • पदाचे नाव – वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता
  • पद संख्या – 378 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • परीक्षा केंद्र: औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 ऑक्टोबर 2022
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

पदसंख्या 

  1. वनक्षेत्रपाल, गट ब – १३ पदे
  2. उप संचालक, कृषि व इतर गट-अ – ४९ पदे
  3. तालुका कृषी अधिकारी व इतर, गट-अ – १०० पदे
  4. कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब – ६५ पदे
  5. सहायक अभियंता,स्थापत्य, गट ब, श्रेणी-2 – १०२ पदे
  6. सहायक अभियंता,विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-2 – ४९ पदे

New Project 23

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.