MPSC Results: एमपीएससीचा निकालही लागला, यांनी पटकावले घवघवीत यश

151

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणा-या युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता मंगळवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020(MPSC Mains examination 2020) चा निकाल सुद्धा जाहीर झाला आहे. या निकालानुसार एकूण 200 पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

यांनी पटकावला पहिला क्रमांक

या परीक्षेत सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रमोद चौगुले या तरुणाने राज्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तर रुपाली माने ही तरुणी मुलींमधून पहिली आहे. तर गिरीश परेकर या तरुणाने मागासवर्ग उमेदवारांधून पहिला क्रमांक पटकावला आहे. कोरोनामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 लांबणीवर जात 4,5 व 6 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आली होती.

(हेही वाचाः UPSC Final Result 2021: यंदा मुलींनी मारली बाजी, महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकर ही १३ व्या स्थानी)

अभियांत्रिकी परीक्षेचा निकालही जाहीर

एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2020(Civil Engineering Mains Exam 2020)चा निकालही आयोगाकडून 31 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. 652 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये रोहित कट्टे याने पहिला नंबर पटकावत बाजी मारली आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत असून, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. या परीक्षांचे संपूर्ण निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

(हेही वाचाः UPSC निकालात महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवार यशस्वी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.