MPSC Revised Advt: समाज कल्याण विभागातील ४१ पदांसाठी नवी जाहिरात; सुधारित आरक्षणासह पदसंख्येत झाला बदल; जाणून घ्या सविस्तर

मूळ जाहिरातीत बदल करून नव्यानं सुधारित जाहिरात काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

163
MPSC Revised Advt: समाज कल्याण विभागातील ४१ पदांसाठी नवी जाहिरात; सुधारित आरक्षणासह पदसंख्येत झाला बदल; जाणून घ्या सविस्तर
MPSC Revised Advt: समाज कल्याण विभागातील ४१ पदांसाठी नवी जाहिरात; सुधारित आरक्षणासह पदसंख्येत झाला बदल; जाणून घ्या सविस्तर

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट अ संवर्गातील ४१ पदांसाठी नवी जाहिरात राज्य लोकसेवा आयोगानं (MPSC) (MPSC Revised Advt) प्रसिद्ध केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात लागू झालेल्या नव्या आरक्षणाच्या अनुषंगानं या सुधारित जाहिरातीत आरक्षणात आणि पदसंख्येत बदल झाले आहेत. हे बदल नेमके काय आहेत? हे जाणून घेणे आवश्यक आहे.

जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट अ संवर्गाकरिता सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग व इतर मागास वर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Vasai Murder Case : घटना माणुसकीला काळीमा फासणारी; महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिले कठोर कारवाईचे निर्देश)

एमपीएससीनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की, सहाय्यक आयुक्त गट अ संवर्गातील ४१ पदांसाठी १० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी ऑब्जेक्टिव्ह स्वरुपाची ऑनलाईन चाळणी परिक्षा घेण्यात येणार होती. दरम्यान, महाराष्ट्रात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अर्थात मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा अस्तित्वात आला. त्यामुळं मूळ जाहिरातीत बदल करून नव्यानं सुधारित जाहिरात काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करणार

त्यानुसार, २७ मे २०२४ च्या आदेशानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी पदं आरक्षित करून सुधारित मागणीपत्र पाठवलं होतं. त्यानुसार, ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ४१ पदांसाठी सर्वसाधारण विविध प्रवर्गासाठी मिळून २९ जागा, महिलांसाठी ११ जागा तर खेळाडू संवर्गासाठी १ जागा तर दिव्यांगांसाठी २ पदं राखीव ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, या चाळणी परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

यामध्ये कुणबी नोंदी सापडलेल्यांसाठीचं जात प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS),इतर मागासवर्ग (OBC)या संवर्गासाठी विशेष सूचना नव्या जाहिरातीत नमूद करण्यात आल्या आहेत.

नव्यानं अर्ज कसा दाखल करायचा याचा कालावधी पुढीलप्रमाणे –

१) अर्ज सादर करायचा कालावधी – २० जून २०२४ रोजी दुपारी २ वाजल्यापासून ४ जुलै २०२४ रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत.

२) ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – ४ जुलै २०२४, रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत

३) एसबीआयमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी आणि चलनाची प्रत घेण्याचा दिनांक – ६ जुलै २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत

४) चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – ८ जुलै २०२४ बँकेच्या वेळेपर्यंत

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.