MPSC च्या विद्यार्थ्यांचे १० तासांपासून पुण्यात आंदोलन; या आहेत मागण्या…

एमपीएसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे गेले १० तास पुण्यात आंदोलन सुरू आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न हा २०२५ पासून लागू करावा ही या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. राज्यात लाखो विद्यार्थी एमपीएसीची परीक्षा देतात. त्यामुळे हा नवा अभ्यासक्रम २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

( हेही वाचा : राज्यात ५ लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट – मंगलप्रभात लोढा)

२०२३ पासून अभ्यासक्रमात बदल करू नये 

पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थी ठिय्या आंदोलन करत आहेत. २०२३ पासून अभ्यासक्रमात बदल करण्यात आले असून या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे हा नियम २०२५ पासून लागू करावा तसेच आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घ्याव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशी आमची राज्य सरकारकडे मागणी असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.

मागण्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न

पुण्याप्रमाणे औरंगाबादमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. औरंगाबादमध्ये महात्मा फुले चौकात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत आंदोलन केले. शासन आपले धोरण वारंवार बदलत असल्याने, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. मागच्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न सुरु केले. परंतु त्यांची दखल घेतली न गेल्यामुळे हे आंदोलन केले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here