जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर असल्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अशातच आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी या संपाला विरोध दर्शवला आहे. संपकऱ्यांच्या नोकऱ्या आम्हाला द्या, आम्ही निम्म्या पगारावर काम करतो, अशी मागणी एमपीएससीचे विद्यार्थी करत आहे.
एका मराठी वृत्तावाहिनी बोलताना एक एमपीएससीचा विद्यार्थी म्हणाला की, महाराष्ट्रातील लाखो तरुण नवीन पेन्शनवर काम करण्यास तयार आहेत. कारण रोजगारच नाहीयेत. मागच्या पाच ते सहा वर्षात भरतीच झालेली नाहीये. लाखो पद शासनाची रिक्त आहेत. आज काँट्रॅक बेसवर लोकं १० हजार रुपयांत काम करतायत. उदा. प्राध्यापकांना २ लाख रुपये पगार आहे, पण तोच प्राध्यापक काँट्रॅक बेसेसवर फक्त १० हजार रुपयांत काम करत आहे.
अशाप्रकारे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला विरोध केला आहे. पेन्शन नको, निम्मा पगार द्या, संपकऱ्यांची नोकरी आम्हाला द्या, असे त्यांचे म्हणणे विद्यार्थ्यांचे आहे. दरम्यान जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात याचिका दाखल केली असून त्यावर २३ मार्चला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
(हेही वाचा – Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, राज्य सरकारची उच्च न्यायालयात स्पष्ट भूमिका; पुढील सुनावणी २३ मार्चला)
Join Our WhatsApp Community