मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर रुग्णालयातील (BMC nair hospital) एमआरआय मशीन व्हेटिलेटरवर गेले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रुग्णांना शारीरिक तपासणीसाठी नायर रुग्णालयाचा रेडिओलॉजी विभाग एमआरआय मशीन बंद असल्याचे रडगाणे ऐकवत आहे. अत्यावस्थ अवस्थेतील रुग्णांना बरेचदा बाहेरच्या रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. नायरच्या बंद एमआरआय मशीनचा सर्वात जास्त फायदा जसलोक या खाजगी रुग्णालयाला होत असल्याने या संपूर्ण प्रकरणावर संशयही व्यक्त केला जात आहे.
(हेही वाचा – Chandrayaan 3 : चंद्रयान ३ च्या यशानंतर ठाण्याच्या साने ब्रदर्स आणि एलोरा इंजिनिअर्सचे इस्रोकडून का केले कौतुक, वाचा सविस्तर…)
गेल्या 9-10 वर्षांपासून नायर रुग्णालयातील (BMC nair hospital) एमआरआय मशीन सतत बंद राहत आहे. याचा सर्वात जास्त फटका भायखळा येथील जेजे रुग्णालयाला बसत आला आहे. जे जे रुग्णालयात रुग्णसेवेचा ताण येत असल्याचे डॉक्टर नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात. जे जे रुग्णालयात आता 3 पाळ्यांमध्ये एमआरआय सेवा दिली जात आहे. तर दुसरीकडे बऱ्याच दिवसांपासून नायर मधील एमआरआय मशीन नादुरुस्त आहे.
नायरच्या बंद एमआरआय मशीनमुळे किमान 50 रुग्णांना जे जे रुग्णालयात तपासणीसाठी यावे लागते. एका एमआरआय मशीनला रुग्ण तपासणीसाठी 45 मिनिटे लागतात. सरकारी आणि पालिका रुग्णालयात वाढत्या रुग्णसंख्येमुळे एका रुग्णाची एमआरआय तपासणी केवळ 20 मिनिटांत आटोपली जाते. सद्यस्थितीत नायर रुग्णालयात (BMC nair hospital) दाखल रुग्णांनाही ५ दिवसाच्या अंतराने एमआरआय तपासणी उपलब्ध होत आहे. यावर नायर पालिका प्रशासनाकडून कोणतेही खात्रीलायक उत्तर मिळत नसल्याची तक्रार रुग्णांनी केली. पालिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी नवीन एमआरआय मशीन खरेदी प्रक्रिया सुरू होत असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र नवीन मशीन कधीपर्यंत येईल, याबाबत स्पष्टता न दिल्याने रुग्णांचे हाल अजून किती दिवस सुरू राहतील, असा संतप्त सवाल रुग्णांनी विचारला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community