MSEB चं ग्राहकांना मोठं आवाहन, लाईट बिलाचे आकडे कमी करण्यासाठी मोलाचा संदेश

129

घरामध्ये प्रत्येक जण आपल्या सोयीसाठी अनेक उपकरणे खरेदी करत असतो. यामध्ये फ्रीज, टीव्ही,एसी,वॉशिंग मशिन यांसारख्या विद्युत उपकरणांची संख्या ही सर्वाधिक असते. या उपकरणांचा घरात सातत्याने वापर करण्यात येत असल्यामुळे भरमसाट विजेचे बील देखील वीज धारकांना भरावे लागते. पण आता ग्राहकांना येणारे हे मोठे वीज बील कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या महावितरण विभागाने ग्राहकांना एक महत्वाचं अवाहन केलं आहे.

विजेचा वापर कमी करणे गरजेचे

घरगुती उपकरणांतील एसी,टीव्ही,फ्रीज,ओव्हन,वॉशिंग मशिन ही सारीच उपकरणे विजेवर चालणारी आहेत. ही उपकरणे घरात रोज वापरली जात असल्यामुळे त्याचा परिणाम येणा-या लाईट बिलावरही होतो. त्यामुळे वाढीव लाईट बिलांवरुन अनेकदा ग्राहकांच्या तक्रारी समोर येत असतात. पण लाईट बिलाचे आकडे कमी करण्यासाठी विजेचा वापरही कमी करणे गरजेचे असते. विजेची जितकी बचत जास्त तितकं लाईट बिलाचे आकडे कमी हे समीकरण आहे.

(हेही वाचाः भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ऐतिहासिक निर्णय, खेळाडूंच्या मानधनाबाबत बीसीसीआयची मोठी घोषणा)

महावितरणचा संदेश

हे समीकरण जुळवून आणण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना आवाहन केले आहे. स्टार जितके जास्त तितकी त्या विद्युत उत्पादनाची “ऊर्जा बचत क्षमता” जास्त असते. म्हणूनच केव्हाही 5 स्टार रेटिंग असलेलेच विद्युत उत्पादन खरेदी करा, असा संदेश महावितरणने ट्वीट करत दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.