MSEB Strike 2023: राज्यात बत्ती गूल होण्याची शक्यता, महावितरणाने जारी केला Toll Free क्रमांक

राज्यभरातील सरकारी वीज क्षेत्रातील कर्मचारी मंगळवार मध्यरात्रीपासून 72 तासांच्या संपावर गेले आहेत. याचा परिणाम महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांच्या दैनंदिन कामकाजावर होण्याची शक्यता आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने महावितराणच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवान्यासाठी अर्ज केला आहे. याद्वारे महावितरण कंपनी अदानी समूहाला विकली जाणार असल्याच्या समजुतीतून हा संप पुकारण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समिती यांनी तीन दिवसीय संपाची हाक दिली आहे. त्यामध्ये राज्य सरकारी महानिर्मीती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही कंपन्यांमधील कर्मचारी आणि अधिका-यांचा समावेश आहे. कर्मचा-यांशी संबंधित 24 संघटना या समितीत आहेत. ‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स’ नेही या संपाला पाठिंबा दर्शवला आहे.

( हेही वाचा: शरद पवारांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींना नाकारले; म्हणाले, भाजपविरोधी पक्षांत चर्चा नाही )

महावितरणकडून टोल फ्री नंबर जारी

  • वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यालयासह सर्व परिमंडळ व मंडळ कार्यालयांच्या ठिकाणी 24 तास संनियंत्रण कक्ष
  • कामे न करणा-या अधिकारी व कर्मचा-यांविरोधात कडक कारवाई
  • वीज गेल्यास ग्राहकांसाठी टोल फ्री, क्रमांक 1800-212-3435/ 1800-233-3435/1912/19120
  • ठाणे मंडळासाठी ग्राहक मोबाईल क्रमांक- 9930269398, वाशी मंडळासाठी ग्राहक मोबाईल क्रमांक- 9920491386 ( नियंत्रण कक्ष) व 8879935501/ 9930025104, पेण मंडळासाठी ग्राहक मोबाईल क्रमांक- 7875765510.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here