वीज कर्मचा-यांचा संप: राज्यातील अनेक जिल्हे अंधारात; कुठे काय परिस्थिती जाणून घ्या

100

महावितरणचे खासगीकरण होऊ नये म्हणून राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत मध्यरात्री 3 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. मध्यरात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत. राज्यातील अनेक भागांत हेच चित्र आहे. महावितरणाच्या कर्मचा-यांनी 72 तासांचा हा संप सुरु राहणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, संपाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचे हाल होताना दिसून येत आहेत.

बदलापूर, अंबरनाथच्या काही भागांत मध्यरात्री 3 वाजल्यापासूनच बत्तीगुल झाली आहे. बदलापूरच्या बेलवली, मांजर्ली, अंबरनाथच्या चिखलोली, सर्वोदयनगरसह इतर भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अंबरनाथ- बदलापूरमधील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. इन्व्हरटरही बंद झाल्याने, अनेकांची गैरसोय झाली आहे.

( हेही वाचा: MSEB Stirke 2023: राज्यात बत्ती गूल होण्याची शक्यता, महावितरणाने जारी केला Toll Free क्रमांक )

सातारा शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी वीजपुरवठा बंद आहे. मध्यरात्री 3 वाजल्यापासून वीजपुरवठा बंद आहे. महावितरणच्या कर्मचा-यांच्या आंदोलनाला सुरुवात झाल्याने साता-यातील बत्तीगुल झाली आहे. महावितरणचे खासगीकरण करु नये, यासाठी कर्मचा-यांनी आंदोलन सुरु केले आहे.

नागपुरात रात्री 12 वाजता महावितरणच्या कर्मचा-यांनी जोरदार घोषणाबाजी करत संप पुकारला. नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा वीज निर्मीती केंद्रातील कर्मचारी संपावर गेले आहेत. पुणे शहरात अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित झाला आहे. सन सिटी, सिंहगड रोड, शिवणे भागातील वीज मध्यरात्रीपासून गायब झाली आहे. वाशिम शहरातील विद्युत पुरवठा मध्यरात्री 1 वाजता खंडित झाला. अचानक वीज गेल्यामुळे सर्व शहर अंधारात बुडाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.