तुम्ही वीजबिल भरलं का? नाहीतर वीज पुरवठा होणार खंडित!

137

राज्यात खूप मोठ्या प्रमाणात वीजग्राहकांकडे थकबाकी असल्याने, महावितरण कंपनीवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे थकबाकीदारांकडून वीजबिलांची वसुली करण्यात येणार आहे, म्हणून ज्यांची थकबाकी आहे त्यांनी त्वरीत वीजबिल भरले नाही, तर वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. राज्यातील वीजग्राहकांकडील थकबाकी सुमारे 65 हजार कोटींवर गेली आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून सुरु आहे. त्यामुळे वीज कर्मचा-यांवर हल्लेही वाढले आहेत, म्हणून वीज कर्मचा-यांवर हल्ले करणा-या व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करुन, कारवाईसाठी विधी विभागाकडून पाठपुरवठा करण्यात येणार आहे.

फौजदारी गुन्हे दाखल होणार

वीजपुरवठा खंडित करायला गेलेल्या कर्मचा-यांना शिवीगाळ, मारहाण किंवा कार्यालयामध्ये जाऊन तोडफोड करण्याचे प्रकार सुरु आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे, कर्मचा-यांना मारहाण करणे , कार्यालयांची तोडफोड करणे या प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अभियंता व कर्मचा-यांना आपले कर्तव्य बजावता यावे, म्हणून शिवीगाळ व मारहाणीच्या प्रकरणांमधील व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करुन तत्काळ कारवाई करण्यासाठी महावितरणाच्या उच्च स्तरावरुन पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे.

( हेही वाचा:धक्कादायक! चुरी कोळश्याच्या जागी चांगल्या दर्जाच्या कोळश्याची उचल )

महावितरणाचे आवाहन

थकीत बिल वेळेत भरले नाही, तर वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईसाठी आवश्यकतेनुसार स्थानिक पोलीस विभागाचे सहकार्य घेण्याची सूचना प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालयांना केली आहे. वीजग्राहकांनीही थकबाकीचा भरणा करुन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.