Scotch Awards 2025 : महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSRDC) यांना हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) यांच्या यशस्वी उभारणीसाठी प्रतिष्ठित “स्कॉच पुरस्कार 2025” देण्यात आला आहे. नुकताच इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे झालेल्या 100 व्या स्कॉच शिखर परिषदेदरम्यान (Scotch Summit) एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड (Dr. Anil Kumar Gaikwad) यांना हा पुरस्कार देण्यात आला. (Scotch Awards 2025)
(हेही वाचा – ‘काही लोकांना फक्त रडण्याची सवय’; भाषेच्या वादात पंतप्रधान Narendra Modi यांनी सीएम स्टॅलिनला सुनावले खडेबोल)
महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलणारा पथदर्शी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. यामुळे, रविवारी ०६ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्थेला एका नवा आयाम प्राप्त झाला आहे. या पुरस्कार सोहळ्यात डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी उपस्थितांना संबोधित करताना समृद्धी महामार्गाच्या उभारणीचा प्रवास उलगडला. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी मिळालेला स्कॉच पुरस्कार म्हणजे एमएसआरडीसीच्या (MSRDC) सर्व सहकाऱ्यांचे कामाप्रती समर्पण आणि मेहनतीचा सन्मान आहे. अनेक आव्हानांवर मात करून आम्ही राज्यातील सर्वात लांब एक्सप्रेसवे विक्रमी वेळेत पूर्ण केला. हा यशस्वी प्रकल्प आम्हाला भविष्यातही महाराष्ट्रासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्रेरित करत राहील, असा आशावाद डॉ.गायकवाड यांनी व्यक्त केला.
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील १० जिल्हे २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणारा एक हाय-स्पीड ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे (Greenfield Expressway) आहे. त्यामुळे नागपूर आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ १६-१८ तासांवरून फक्त ७-८ तासांवर आला आहे. या एक्सप्रेसवेमुळे विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशात कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे, ज्यामुळे राज्याच्या आर्थिक वाढीला हातभार लागत आहे.
(हेही वाचा – सिंहस्थ कुंभमेळ्यातील सोईसुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करा; धर्माचार्य Madhavdas Rathi Maharaj यांची मागणी)
प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार नेमका काय?
२००३ मध्ये स्थापन झालेला स्कॉच पुरस्कार हा प्रशासन, समावेशक विकास, तंत्रज्ञान उत्कृष्टता, कॉर्पोरेट नेतृत्व, नागरिक सेवा वितरण या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थांना आणि व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारताला अधिक प्रगत आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्ती, प्रकल्प आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community