एसटीच्या अमृत योजनेला ज्येष्ठ नागरिकांची पसंती

राज्य सरकारने एसटी महामंडळातर्फे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत योजनेच्या माध्यातून राज्यात मोफत एसटी प्रवास करण्याची मुभा दिली आहे. उत्सव काळात या योजनेचा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. एसटीच्या अमृत योजनेची २६ ऑगस्टपासून अंमलबजावणी होऊन, २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत ९ लाख ५० हजार ११७ ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला. तर सरासरी ९० ते ९७ हजार प्रवाशांनी रोज प्रवास केला.

( हेही वाचा : नवरात्रीसाठी मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! BKC ते ठाणे सुरू होणार प्रिमियम बससेवा)

ग्रामीण भागातून उदंड प्रतिसाद 

एसटीच्या अमृत योजनेला शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या थोड्याच दिवसात घटस्थापना होणार आहे. या कालावधीत सुद्धा देवीच्या दर्शनासाठी भाविक मार्गस्थ होतात. त्यामुळे आगामी उत्सवांच्या दिवसात सुद्धा या योजनेचा लाभ लाखो ज्येष्ठ नागरिकांना घेता येईल.

ओळखपत्र आवश्यक 

तसेच एसटीतून प्रवास करणाऱ्या ७५ ते ६५ वर्षांपर्यंतच्या प्रवाशांना तिकीट दरात ५० टक्के सवलत आहे. या प्रवाशांना त्यांचे ओळखपत्र म्हणजेच आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, पारपत्र यापैकी एक ओळखपत्र दाखवून सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here