एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही, हे शुक्रवारी स्पष्ट झाल्यावर महामंडळाने संप करत असलेल्या कर्मचा-यांना तातडीने कामावर रुजू होण्यास सांगितले. तसेच, या कर्माचा-यांवर कोणतीही कारवाई होणर नाही, याचीही हमी दिली. पण, ज्या कर्मचा-यांना बडतर्फ करण्यात आले आहे वा ज्यांच्या सेवासमाप्तीची घोषणा करण्यात आली आहे. अशा कर्माचा-यांना अपील करुन, कामावर हजर राहण्याचे आवाहन पुन्हा एकदा एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.
तरीही हजेरी नाहीच
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांहून अधिक एसटी कर्माचा-यांचे आंदोलन सुरु आहे. या संपकरी कर्माचा-यांनी कामावर यावे यासाठी महामंडळाने विविध प्रयोग केले. बडतर्फ, निलंबन, कारणे दाखवा नोटीस, बदली अशा प्रकारची कारवाई करण्यात आली. यानंतरही कर्मचारी कामावर आले नाहीत.
( हेही वाचा सावरकरांनी सांगितलेला हिंदू धर्म हाच खरा माणूसधर्म )
कुठलीही कारवाई नाही
बडतर्फ कर्मचा-यांना विभाग नियंत्रकांकडे अपील करावे लागेल. त्यावर सुनावणी होईल. त्यात कर्माचा-याला कामावर घेण्याचा निर्णय घेतला जाईल. बडतर्फीच्या प्रकरणात कर्मचा-याला कारवाईला सामोरे जावे लागते, मात्र कामावर रुजू होण्याचे मार्ग खुले होतात. महामंडळाने कर्माचा-यांनी 10 मार्च पर्यंत कामावर येण्याचे आवाहन केले आहे. कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. महामंडळाने 4 ते 5 मार्च या दरम्यान, दोन परिपत्रके काढली. त्यात संपामुळे झालेल्या नुकसान भरपाईची नोटीस देऊ नका, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community