MSRTC Bus Accident : शिवशाही बसला पनवेल येथे भीषण अपघात; बसमध्ये होते ४० प्रवासी

जखमींवरत उपजिल्हा रुग्णालय पनवेल आणि एमजीएम आणि एमजीएम कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

261
अपघातग्रस्त शिवशाही बस

पनवेल-महाड शिवशाही बस (shivshahi bus) क्र. MH 09 EM 9282च्या चालकाचे नियंत्रण सुटले, या अपघातामुळे मोठी दुर्घटना घडली. MSRTC Bus Accident ही घटना मुंबई -गोवा महामार्गावर मौजे कर्नाळा ता. पनवेल येथील हद्दीमध्ये दुपारी 3:50 वाजताच्या दरम्यान घडली आहे.

MSRTC Bus Accident बसमध्ये 38 प्रवासी, बस चालक, वाहक असे एकूण 40 लोक होते, यापैकी 22 प्रवासी जखमी झाले, तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. जखमींवरत उपजिल्हा रुग्णालय पनवेल आणि एमजीएम आणि एमजीएम कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात होत असतात, आता मुंबई – गोवा महामार्गावरही अपघात होऊ लागले आहेत. या महामार्गावरील इंदापूरपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण झाले नाही, त्यामुळे इथे आता अपघात होऊ लागले आहेत.

(हेही वाचा MSRTC: एसटीच्या काचांवर स्टीकर्स नको, महामंडळाने काढले पत्रक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.