सेलू तालुक्यात एसटीचे 55 प्रवासी भीषण अपघातातून वाचले

153

एसटी बसला होणाऱ्या अपघातात वाढ होताना दिसत आहे. असाच एक भीषण अपघात सेलू तालुक्यात एसटी बसला झाला, सुदैवाने यातील 55 प्रवाशांचे प्राण वाचले.

बस काही भाग पुलाखाली आला

वर्धेवरून आर्वीला जाणारी परिवहन महामंडळाची बस सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील धाम नदीच्या पुलावरून खाली कोसळताना वाचली. ही घटना सायंकाळी ७.३० वाजता घडली. एम एच ४०/ ५२९७ क्रमांकाची आर्वी आगाराची जादा बस वर्धावरून सात वाजता निघाली, मात्र येळाकेळी पुलाजवळ येतात चालक अचानक दचकला आणि बसवरील त्यांचे नियंत्रण सुटले त्यामुळे बस पुलाचा कठडे तोडून बसचा काही भाग पुलाखाली आला, मात्र प्रसंगावधान राखून चालकाने बसवर पुन्हा नियंत्रण मिळविले. त्यामुळे सर्व वाचले बस जर खाली पडली असती तर अनेकांचे जीव गेले असते. चालक अमोल भांगे यांच्या डोळ्याला मात्र मार लागला आहे. एक प्रवासी किरकोळ जखमी आहे. बसमधील ५५ ते ५७ प्रवासी होते. या बसवर राहून इथापे वाहक होते.

(हेही वाचा श्रीक्षेत्र जांबमधून देवतांच्या मूर्ती चोरणारे आरोपी निघाले धर्मांध मुस्लिम )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.