बेदारकारपणे गाडी चालवणाऱ्या एसटी महामंडळाच्या (MSRTC) शिवनेरी बस (Shivneri Bus) चालकाने दि. १३ मार्च रोजी प्रभादेवी ब्रिजवर मध्यरात्री २.३० तिघांना चिरडले आहे. प्रणय बोडके (Pranay Bokade) (29), करण शिंदे (29)आणि दुर्वेश गोरडे (Durvesh Gorde) हे तिघेजण स्कुटर वरून परेल वरून दादरला होळीसाठी फुले आणण्यास चालले होते. त्यावेळी हा अपघात घडला.
( हेही वाचा : मातोश्रीबाहेर पुन्हा एकदा Shiv Sena ची बॅनरबाजी करत राजकीय धुळवड)
मुंबईतील प्रभादेवी ब्रिजवर होळीसाठी फुले आणायला जाणाऱ्या तीन तरुणांना शिवनेरी बस चालकाने चुकीच्या दिशेने भरभाव वेगात येत चिरडले. त्यात प्रणय बोडके (Pranay Bokade) याचा केईएम रुग्णालयात (KEM Hospital) उपचारादरम्यान मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त दुर्वेश आणि करण गंभीर जखमी असून त्यांच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इकबाल शेख असे चालकाचे नावं असून तो MSRTC ची निळ्या रंगाची बस MH12VF3305 चालवत होता. चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना अपघातस्थळी असणाऱ्या नागरिकांना त्याला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. (MSRTC)
मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग कारचा भीषण अपघात
दरम्यान शिमगोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या कारला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुकेळी खिंडी जवळ आग लागली. गाडी मधून प्रवास करणारे तिनही प्रवासी सुरक्षित असले तरी कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. सी एन जी किट जळून खाक झालं. कारमधून स्फोटाचे जोरदार आवाज येत होते. महामार्गावर भीती निर्माण झाली होती त्यामुळे काही काळासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community