कोरोनाकाळात एसटी सेवा बंद होती यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी एसटीने मालवाहतुकीची सेवा विस्तारित केली आहे. आता घरातील सामान शिफ्ट करण्यासाठी सुद्धा एसटीची मदत घेतली जात आहे. या मालवाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात एसटीला मालवाहतुकीमधून चार महिन्यात १ लाख ६६ हजार रुपये एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
( हेही वाचा : Mumbai Local : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार! AC लोकलच्या ८ फेऱ्या वाढणार; पहा वेळापत्रक )
कोरोनाकाळात महामंडळाने मालवाहतुकीतून आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रवासी गाड्यांमध्ये काही प्रमाणात बदल करून मालवाहतुकीसाठी गाड्या तयार करण्यात आल्या आहेत.
या वस्तूंची एसटीद्वारे वाहतूक
किराणा, ऑटोमोबाईल, स्टेशनरी, शेती संबंधित उत्पादने, सिमेंट आणि इतर काही मालाची वाहतूक एसटीद्वारे केली जाते. बालभारतीच्या शालेय पुस्तकांचा पुरवठा एसटीच्या मालवाहतुकीद्वारे करण्यात आला आहे. खासगी मालवाहतुकीच्या तुलनेत एसटी मालवाहतुकीचे दर परवडत असल्याने व्यापारी या सेवेला प्राधान्य देतात. घरातील सामान शिफ्ट करण्यासाठी सुद्धा या सेवेचा उपयोग होतो. राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आणि तिरोडा आगाराला मालवाहतुकीतून १ लाख ६६ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
Join Our WhatsApp Community