‘लालपरी’ आता ‘सीएनजी’वर धावणार!

लालपरी संपूर्ण महाराष्ट्रात सेवा देते. राज्यातील अंतर्गत प्रवासासाठी एसटीचा वापर केला जातो. ग्रामीण भागात आजही सार्वजनिक वाहतूकीसाठी एसटीला पसंती मिळत आहे. काळानुरूप एसटीमध्ये अनेक बदल होत आहेत.

( हेही वाचा : ‘मूळ पक्ष आमचाच, आम्हाला पक्षाचे चिन्ह मिळावे!’ शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे लेखी युक्तिवाद सादर)

सीएनजीवर धावण्याचा मार्ग मोकळा

आगामी काळात लालपरी डिझेलवर न धावता ‘सीएनजी’वर धावणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने डिझेलवर धावणाऱ्या एसटी बसेसचे रूपांतर सीएनजीवर धावणाऱ्या गाडीत केले आहे. हा बदल योग्य असून त्यात कोणत्याही प्रकारचा दोष नसल्याने ही एसटी प्रवासी सेवेत धावण्यासाठी योग्य असल्याची मंजुरी हरियाना येथील आयकॅट (इंटरनॅशनल सेंटर फॉर ॲटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी) संस्थेने दिली. त्यामुळे लालपरी सीएनजीवर धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांचे रुपांतर करणार 

राज्यात लवकरच १ हजार एसटी बस ‘सीएनजी’वर धावताना दिसतील. राज्यात ‘सीएनजी’चा सर्वदूर पुरवठा नसल्याने राज्य परिवहन महामंडळाने ज्या ठिकाणी सीएनजी पुरवठा होईल, त्याच ठिकाणी ही सेवा देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात डिझेलवर धावणाऱ्या १ हजार एसटीचे रूपांतर सीएनजीमध्ये केले जाईल. केवळ शहरी भागापुरतीच ही सेवा असेल. एसटीच्या सर्व डेपोंमध्ये सीएनजी पुरवठा करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here