MSRTC : लालपरीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती; प्रशिक्षण शेवटच्या टप्प्यात

189

एसटीत चालक म्हणून आता महिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. एसटीकडून चालक-वाहक म्हणून ११ महिलांची निवड करण्यात आली असून या महिलांचे १ वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. अवजड वाहन परवान्यासाठी पुन्हा ८० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या महिला सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे एसटीचे स्टेअरिंग आता लवकरच महिलांच्या हाती येणार आहे.

एसटी महामंडळाच्या भरती प्रक्रियेमध्ये ११ महिलांची जुलै २०२१ मध्ये निवड करण्यात आली होती. जास्तीत जास्त महिलांचा या भरती प्रक्रियेला प्रतिसाद मिळावा यासाठी काही अटींमध्ये बदल करण्यात आला होता. पुरूष महिलांसाठी अवजड वाहन परवाना व तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव अशी अट ठेवण्यात आली होती. यानुसार महिलांनी अर्ज केले होते. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर चालक-वाहक पदासाठी ११ महिला पात्र ठरल्या.

या महिलांना अवजड वाहन चालवण्यासाठी एक वर्षांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. ११ पैकी सहा महिलांनी उत्तमपणे प्रशिक्षण पूर्ण करून सध्या अवजड वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी पुन्हा ८० प्रशिक्षण सुरू आहे. यानंतर या महिला सेवेत दाखल होणार आहेत.

प्रथम या महिला चालकांना छोट्या अंतरावर म्हणजेच सांगली-मिरज मार्गावर एसटी बस चालवण्याचा अनुभव दिला जाईल. त्यानंतर या महिला चालकांची लांब पल्ल्याच्या मार्गावर करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.