MSRTC Complaint: प्रवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एसटीचं पुढचं पाऊल; आता आगरामध्येच करता येणार तक्रार

158
MSRTC Complaint: प्रवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एसटीचं पुढचं पाऊल; आता आगरामध्येच करता येणार तक्रार
MSRTC Complaint: प्रवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एसटीचं पुढचं पाऊल; आता आगरामध्येच करता येणार तक्रार

विविध लोकप्रिय योजनांनी राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेसमधून प्रवाशांची गर्दी वाढत आहे. परंतु, त्या प्रमाणात सोयी–सुविधांचा विकास साधण्याकडे व्यवस्थापनाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. भंगार झालेल्या बसेस, आयुर्मान संपुष्टात आले किंवा नसले तरीसुद्धा देखभाल – दुरुस्तीकडे कानाडोळा झालेल्या बसेसमधून आरामदायी प्रवास दिवास्वप्न ठरत आहे. मात्र आता प्रवासी व कामगारांच्या समस्या, तक्रारी, सूचनांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा होण्यासाठी सोमवारपासून (१५ जुलै) एसटी आगारनिहाय प्रवासी राजा दिन (Pravasi Raja Din)  व कामगार पालक दिन (Kamgaar Palak Din) आयोजित करण्यात येत आहे.  (MSRTC Complaint)

(हेही वाचा – ‘भाजपानेही काँग्रेसप्रमाणे चुका केल्या तर…’ Nitin Gadkari यांचा आपल्याच पक्षाला इशारा की संदेश?

तक्रारीचे निवारण असे होणार

या उपक्रमाअंतर्गत संबंधित विभागाचे विभाग नियंत्रक वेळापत्रकानुसार एका आगारात जाऊन सकाळी १० ते दुपारी २ या सत्रामध्ये प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्वीकारतील. त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे याचे संबंधितांना आदेश देतील. एसटीमधून रोज सुमारे ५४ ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे स्वच्छ, निर्जंतुक आणि टापटीप असावीत, असे प्रवाशांना वाटते. बस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी सौजन्याने वागावे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. तक्रारींचे निराकरण वेळेत झाले नाही तर प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. राज्यभरातील सर्व आगारांत दर सोमवारी व शुक्रवारी या दोन्ही उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रवासी तसेच प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये यांनी समस्या – तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडू शकतात. (MSRTC Complaint)

(हेही वाचा – Manorama Khedkar यांचा शस्त्र परवाना रद्द होणार?)

तक्रारी अथवा समस्या लेखी स्वरूपामध्ये ज्या दिवशी आपल्या संबंधित आगारात उपरोक्त उपक्रमाचे आयोजन केले असेल तेव्हा उपस्थित राहून विभाग नियंत्रकांकडे द्याव्यात, असे आवाहन प्रवासी व कर्मचारी यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. (MSRTC Complaint)

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.