एसटीचे चालक देशात अव्वल

178

देशातील खाजगी व सार्वजनिक परिवहन संस्थेच्या कोणत्याही चालकांमध्ये महाराष्ट्राच्या एसटीचे चालक हे अतिशय शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि प्रशिक्षित असल्याने ते देशात अव्वल ठरतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी  काँग्रेसचे सरचिटणीस, श्रीरंग बरगे  यांनी केले. परिवहन विभागामार्फत १७ सप्टेंबर रोजी वाहन चालकांच्या गौरवार्थ “वाहन चालक दिन” साजरा करण्याचे निश्चित केले असल्याने, त्यानुसार एसटीच्या चालकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांची आपल्या कर्तव्याप्रती असलेली कटिबद्धता लक्षात घेऊन, त्यांचा फूल देऊन महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस तर्फे गौरव करण्यात आला.

कोट्यावधी प्रवाशांचा सुरक्षित प्रवास

एसटीमध्ये सध्या ३६ हजार ३८८ चालक कार्यरत आहेत. तब्बल  १४२ दिवसांच्या खडतर प्रशिक्षणानंतर एसटीच्या चालकांना प्रत्यक्ष कामावर रुजू करुन घेतले जाते. त्यांना अपघात विरहित सेवेबद्दल वेळोवेळी प्रोत्साहित केले जाते. तसेच विशिष्ट कालावधीनंतर त्यांचे समुपदेशन व प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे त्यांच्या वाहन चालन पद्धतीमध्ये दिवसेंदिवस अमूलाग्र बदल घडून येत आहेत. याचा परिणाम म्हणून एसटीच्या अपघातांची संख्या इतर कोणत्याही परिवहन संस्थेपेक्षा अतिशय कमी आहे. सुरक्षित वाहन चालवण्याचे कौशल्य एसटीच्या चालकांनी आत्मसात केल्यामुळे कोट्यावधी प्रवाशांना सुरक्षित प्रवास करण्याचे अभिवचन एसटीने वेळोवेळी दिले आहे.

(हेही वाचाः मांस खाताय? मग तुम्ही जागतिक तापमान वाढीला जबाबदार आहात)

परिवहन विभागाचे आभार

दळणवळण व वाहतूक क्षेत्रातील चालक हा महत्वाचा घटक समजून त्याच्या भूमिकेला अनन्यसाधारण समजून १७ सप्टेंबर हा दिवस चालक दिन म्हणून जाहीर केल्याबद्दल शासनाच्या परिवहन विभागाचे विशेष आभार सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आले. या वेळी संघटनेचे विभागीय सचिव मधुकर तांबे, आगार सचिव संदीप कातकर, राहुल माने, विठ्ठल गर्जे आदी पदाधिकारी व चालक हजर होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.