एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे म्हणून, एसटी कर्मचारी अद्यापही आग्रही आहेत. मंगळवारी आझाद मैदानात मोठ्या संख्येने एसटी कर्माचारी आंदोलनासाठी एकत्र येणार आहेत. त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या निर्णयानुसार, एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नाही, पण एसटी कर्मचारी मात्र आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.
विलीनीकरण शक्य नाही
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्माचा-यांनी मागच्या तीन महिन्यांपासून संप पुकारला आहे. कर्मचा-यांच्या मागण्या लक्षात घेता, सरकारकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अहवालानुसार, विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट झाले.
( हेही वाचा इस्लामिक स्टेटशी संबंधित तल्हा खानच्या घरी एनआयएची छापेमारी! )
…तरीही कर्मचारी ठाम
त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्माचा-यांना कामावर रुजू होण्यासाठी 10 मार्चपर्यंतची मुदत दिली. मात्र अद्यापही संपावर कर्मचारी ठाम आहेत. सध्या अधिवेशन सुरु असल्याने, पुन्हा एकदा हा मुद्दा आक्रमकपणे समोर येण्याची शक्यता आहे. मंगळवारी राज्यभरातून आझाद मैदान येथे एसटी कर्माचा-यांना बोलावण्यात आल्याची माहिती विलीनीकरणाचे सदस्य व एसटी कर्मचारी सतीश मेटकरी यांनी सांगितले. सोमवारी आझाद मैदानात एसटी कर्मचा-यांनी अहवालाचा निषेध नोंदवला आणि विलीनीकरणाची मागणी करत, अर्धनग्न अवस्थेत आंदोलनही केले.
Join Our WhatsApp Community