एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यासाठी वेतनासाठी सरकार दरबारी तडजोड करावी लागत आहे. सरकारकडे वेतनासाठी हात पसरावे लागत आहेत. प्रत्येक महिन्यातील ही कसरत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील वेतनासाठीही करावी लागणार आहे. कारण सप्टेंबर महिन्यातील वेतन ७ ऑक्टोबर रोजी होण्याची अपेक्षा आहे, पण दुर्दैवाने या महिन्यातही वेतनाची तारीख हुकणार आहे, अशी शक्यता आहे.
वेतन वेळेवर मिळाले पाहिजे. निधी कुठून आणायचा हे प्रशासनाचे काम आहे. महिनाभर काम केल्यावर वेतन मिळणार नसेल तर हा अन्याय आहे.
– श्रीरंग बरगे , सरचिटणीस महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस
महामंडळांलाच पैशाची जमवाजमव करण्याचे आवाहन!
कोरोना काळात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे महामंडळाच्या फेऱ्या ठप्प होत्या. त्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळाले नाही. म्हणून राज्य सरकारने वेतन अदा होण्यासाठी महामंडळाला आर्थिक साहाय्य केले. त्यामुळे मध्यवर्ती कार्यालयातून संबंधित विभागांना त्यांच्या त्यांच्या मागणीनुसार वेतनासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत झाले आहेत, त्यामुळे महामंडळाची वाहतूक सुरु झाली आहे. म्हणून आता विभाग नियंत्रकांनी विभागाकडे जमा होणाऱ्या उत्पन्नाचे नियोजन करून वेतन विहित तारखेस कर्मचाऱ्यांना अदा करावे, वेतन हे नियोजित तारखेत अदा द्यावे, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाचे वित्तीय सल्लागार यांनी केले आहे. अशा प्रकारे आता राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी महामंडळ वेतनाच्या नियोजित ७ तारखेच्या आधीपासून २ दिवस पैशाची जमवाजमव सुरु केली आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळेत हे वेतन अदा होईल का, अशी शंका निर्माण झाली आहे.
(हेही वाचा : श्रीमंतांच्या यादीत झुकेरबर्गचे ‘मार्क’ झाले कमी… सर्व्हर क्रॅशचा बसला फटका)
Join Our WhatsApp Community