बेस्ट कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात संपाचा इशारा दिल्यामुळे एसटी गाड्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या. १८ मे २०२० रोजी संपाचा इशारा दिला होता त्यावेळी मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने सुमारे १२०० गाड्या रायगड, कोकण तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून मागवण्यात आल्या होत्या. १२०० पैकी ६५३ गाड्या प्रत्यक्ष मुंबईत दाखल झाल्या. मात्र मागण्यांवर तोडगा निघाल्यामुळे संप झाला नाही आणि या एसटी गाड्या माघारी परतल्या.
( हेही वाचा : १ डिसेंबरपासून काय बदलणार? सामान्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम…)
एसटीला आर्थिक भुर्दंड
जवळपास ३०० गाड्या पनवेल, पेण, ठाणे येथून परत गेल्या याचे बिल एसटी महामंडळाने लावलेले नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टच्या मदतीला लालपरी आली होती. या दरम्यान बेस्टकडून एसटी महामंडळाला २ कोटींहून अधिक रक्कम येणे आहे याबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच पैसे मिळतील अशी अपेक्षा महामंडळाचे अध्यक्ष शेखर चन्ने यांनी सांगितले.
दरम्यान, सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान बेस्टच्या दुमजली इलेक्ट्रिक एसी बस मुंबईकरांच्या सेवेत समाविष्ट होती असे सांगण्यात आले होते परंतु आता नोव्हेंबर महिना उजाडला तरीही मुंबईकरांना दुमजली बसची प्रतीक्षा आहे.
Join Our WhatsApp Community