आता एसटी भाडेतत्वावर घेणार ५०० गाड्या

एसटी महामंडळाने भाडेतत्वावर खासगी ५०० गाड्या घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

एसटीच्या गाड्या म्हटल्या की अनेकजण किती त्या जुन्या गाड्या, असे म्हणत नाक मुरडत असतात. एका बिघाड झालेल्या एसटीच्या बसमुळे एक बाईकस्वार जखमी झाल्याची घटना देखील नुकतीच घडली. मात्र, आता या जुन्या भंगार झालेल्या एसटी बंद होणार असून, त्याऐवजी आता रस्त्यावर नवीन एसटी गाड्या दिसतील, अशी माहिती मिळत आहे. एसटी महामंडळाने भाडेतत्वावर खासगी ५०० गाड्या घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

एकूण १२०० बसेस ताफ्यात येणार

एसटी महामंडळाने खासगी भाडेतत्वावर 500, तर एसटीच्या मालकीच्या 700 अशा एकूण 1200 बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. दरम्यान 500 बसेसची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान याच्या निविदा मागवण्यात आल्या असून, बीएस-6 बनावटीच्या या बसेस असल्याचे एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी हिंदुस्थान पोस्टसोबत बोलताना सांगितले.

(हेही वाचाः एसटी कर्मचा-यांची प्रवाशांना मारहाण! बघा सीसीटीव्ही फुटेज)

…म्हणून बस घेण्याचा निर्णय

एसटी महामंडळातील सुमारे 3500 बसेसचे आयुर्मान संपले आहे. मालवाहतुकीसाठी सुद्धा बसेसचे रुपांतरण केले जात आहे. त्याशिवाय नादुरुस्त बसेस असल्याने प्रवासी बसेसची संख्या घटली आहे. त्यामुळे एसटीच्या ताफ्यात साध्या बसेस वाढवणे आवश्यक आहे. शिवाय दरवर्षी आयुर्मान संपणाऱ्या गाड्यांच्या ठिकाणी नवीन गाड्या घेण्याची प्रक्रिया सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये पार पडली नसून, एकही नवीन गाडी एसटीच्या ताफ्यात उतरली नाही. याचमुळे आता महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचाः ठाकरे सरकार एसटी कर्मचाऱ्याच्या बेधडकपणाला घाबरले!

ड्रायव्हरसहित या ५०० गाड्या आपण घेत आहोत. सात ते आठ महिन्यांत या गाड्या दाखल होणार असून, महामंडळ मालकीच्या गाड्या देखील खरेदी करणार आहे. खासगी गाड्या या प्रायोगिक तत्वावर आम्ही घेत असून, निविदा लवकरच निघेल.

 

-शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक

एसटीला गाड्या घेण्यासाठी सरकारने बजेटमध्ये स्वतंत्र तरतूद केली असताना, त्याऐवजी भाड्याने गाड्या घेण्याचा अट्टाहास का? कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय निर्माण होत आहे.

-श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here