MSRTC चा ‘आवडेल तेथे प्रवास’ महागला

77

महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नुकतीच नियमित तिकीट दर वाढ केल्यानंतर आता ‘आवडेल तेथे प्रवास’ यासाठीचा दरही वाढवला आहे.

महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने आवडेल त्या ठिकाणी कोठेही प्रवास करण्यासाठी ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही सवलत योजना प्रवाशांसाठी MSRTC मार्फत राबविली जाते. या योजनेअंतर्गत ७ दिवस व ४ दिवस याप्रमाणे बसेच्या प्रकारानुसार तसेच आंतरराज्यांसह प्रवास सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. या योजनेअंतर्गंत येणाऱ्या बससेवांचे प्रतिटप्पा दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन टप्पा दरपत्रकाप्रमाणे देण्यात येणाऱ्या पासचे सुधारीत दर, अटी व शर्ती लागू करण्यास सक्षम प्राधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. हे दर १ फेब्रुवारी २०२५ पासून अंमलात येणार आहे.

(हेही वाचा Govind Pansare Murder Case : पुरोगाम्यांचा दबाव दूर करण्यासाठी पानसरे खटला कोल्हापूर जिल्ह्याबाहेर चालवा; सनातन संस्थेची मागणी)

सेवेचा प्रकार                          ४ दिवसांच्या पासचे दर                             ७ दिवसांच्या पासचे दर

  • साधी, जलद, रात्रसेवा                प्रौढ- १८१४, मुले- ९१०                             प्रौढ- ३१७१, मुले- १५८८
    आंतरराज्य, शहरी, मिडीबस
  • शिवशाही (आसनी)                  प्रौढ- २५३३, मुले-१२६९                            प्रौढ- ४४२९, मुले-२२१७
  • १२ मीटर ई-बस (ई-शिवाई)         प्रौढ- २८६१,  मुले- १४३३                         प्रौढ-५००३,  मुले-२५०४
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.