‘एसटी’तून प्रवास करताना अपघात झाल्यास; महामडंळ करणार मदत

एसटी महामंडळाकडून प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून वेळोवेळी खबरदारी घेतली जाते. परंतु अनेकदा विविध कारणाने अपघातही घडत असतात. अपघाताप्रसंगी महामंडळाकडून तातडीची मदत दिली जाते. त्यामुळे एसटीमधून प्रवास करताना, अपघात झाल्यास तातडीने मदत किंवा लाभही मिळणार आहे.

बहुतांश अपघात हे रस्ते खड्डेमय असल्याने होत असले तरी आता रस्ते गुळगळीत झाल्यानेही अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. रस्त्यांवर अनेक वाहने भरधाव वेगाने धावतात. त्यातच ओव्हरटेक करणे, समोरुन किंवा मागून धडक देणे, वाहने पलटी होणे, ब्रेक फेल होणे, रस्त्याचा किंवा वळणाचा अंदाज न येणे आदी अनेक कारणांनी अपघात होतात. एसटीने सायकलस्वार, पादचारी किंवा राज्य परिवहन मंडळतील प्रवाशांचा अपघात झाल्यास त्यांना तातडीने  मदत दिली जाते.

किती मिळते मदत 

एसटीचा अपघात झाल्यास त्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सहायता निधीअंतर्गत दहा लाखांची मदत दिली जाते. तर गंभीर जखमींना पाच लाखांपर्यंत मदत दिली जाते. जखमी कोणत्याही रुग्णलयात भरती असेल तर उपचाराचा खर्च महामंडळ करते. अपघात झाल्यावर तातडीने किरकोळ जखमी झालेल्यास पाचशे रुपये तर जखम जास्त असल्यास हजार रुपये मदत दिली जाते.

( हेही वाचा: यूपीतील शाळांमध्ये मराठीचे धडे? )

अपघातानंतर मदतीसाठी काय कराल 

अपघात झाल्यानंतर, परिवहन महामंडळाकडून  मदत केली जाते. जखमींना पी-फाॅर्म दिला जातो. फाॅर्म भरुन दिल्यावर उपचाराचा खर्च महामंडळ करीत असते.

एसटीला 65चा  स्पीड लाॅक 

एसटीचा अपघात घडू नये म्हणून 60 किंवा 65 च्या स्पीडवर बस ब्लाॅक केल्या जातात. अचानक अपघाताचा प्रसंग आला, तर चालक बस नियंत्रणात ठेवू शकतो. यासाठी वेगावर मर्यादा लावली जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here