एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याबाबत न्यायालयाने सूचना दिल्यानंतर, आता टप्प्याटप्याने कर्मचारी कामावर हजर होत आहेत. कणकवली विभागात गेल्या तीन दिवसात ६४ कर्मचारी हजर झाले आहेत. तर आतापर्यंत सुमारे ३०० फेऱ्या सुरु झाल्या आहेत. महामंडळाच्या सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.
50 टक्के वाहतूक होणार सुरु
गेल्या तीन दिवसात १५ चालक, १२ वाहक, १६ चालक कमी वाहक, १८ यांत्रिकी कर्मचारी, तीन प्रशासकीय कर्मचारी असे ६४ कर्मचारी हजर झाले आहेत. पुढील काही दिवसांत आणखी कर्मचारी हजर होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्मचारी हजर झाल्यानंतर, टप्प्याटप्प्याने एसटी वाहतूकही अधिक प्रमाणात सुरु होणार आहे. गेल्या आठवड्यात २२० पर्यंत सुटणाऱ्या फेऱ्या आता ३०० पर्यंत गेल्या असून पुढील आठ दिवसांत ५० टक्के वाहतूक सुरु होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
( हेही वाचा: मराठी शाळांची वाताहत, मदरशांवर मात्र खैरात, उद्धवा अजब तुझे सरकार! )
अद्यापही आंदोलन सुरुच
गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचा-यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर हे आंदोलन अधिक चिघळल्याचे पहायला मिळाले. शरद पवार यांच्या विरोधात प्रक्षोभक विधाने केल्यामुळे हा हल्ला झाल्याचा आरोप करत, गुणरत्न सदावर्तेंना अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community