MSRTC Recruitment : १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी! असा करा ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जालना विभाग अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण ३४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर २०२२ आहे.

( हेही वाचा : FIFA 2022 : जपानने मॅचसोबत जिंकले संपूर्ण जगाचे मन! स्टेडियममध्ये दिला महत्त्वाचा संदेश; व्हिडिओ होतोय व्हायरल)

अटी व नियम जाणून घ्या…

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
पदसंख्या – ३४ जागा
नोकरी ठिकाण – एसटी महामंडळाचा जालना विभाग
वय – १८ वर्ष पूर्ण
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ५९० रुपये, मागासवर्गीय – २९५ रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज प्रत पाठवण्याचा पत्ता

विभाग नियंत्रक, रा.प. विभागीय कार्यालय, अतिरिक्त औद्योगिक वसाहत, एन.आर.बी.कंपनी समोर, औरंगाबाद रोड, जालना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ डिसेंबर २०२२
अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

पदसंख्या

पदवीधर/पदविका अभियांत्रिकी – १ पद
यांत्रिकी मोटार गाडी – २० पदे
वीजतंत्री – ३ पदे
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर – ९ पदे
वेल्डर – १ पद

पात्रता व वेतनश्रेणी

  • पदवीधर/पदविका अभियांत्रिकी – उमेदवाराने अभियांत्रिकी महाविद्यालयतील मॅकेनिक/ऑटोमोबाईल अभियंता शाखेतील पदवी/पदविका धारण केलेली असावी. (७ ते ९ हजार रुपये)
  • यांत्रिकी मोटार गाडी – १० वी उत्तीर्ण आवश्यक, उमेदवाराने आयटीआय, २ वर्षांचा मोटार मॅकेनिक व्यवसायाचा कोर्स पूर्ण करणे आवश्यक ( ९ हजार ५३५ रुपये)
  • वीजतंत्री – १० वी उत्तीर्ण आवश्यक, आयटीआय पास ( ८ हजार ४७६ रुपये )
  • वेल्डर – १० वी उत्तीर्ण आवश्यक, आयटीआय पास ( ८ हजार ४७६ रुपये)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here