75 वर्षावरील जेष्ठांना एसटीच्या बसमधून मोफत प्रवास आणि राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत या दोन योजना एसटीसाठी मैलाचा दगड ठरल्या आहेत. या राज्य शासनाने जाहीर केलेल्या दोन योजना लोकप्रिय झाल्यामुळे एसटीला गेल्या दोन वर्षांमध्ये ३८९३ कोटी ८८ लाख ४१ हजार रुपये इतके भरघोस उत्पन्न मिळाले आहे. या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून मिळते. परिणामी मे 2024 मध्ये एसटीला 16 कोटी इतका नाममात्र तोटा झाला असून लवकर एसटी फायद्यात चालवता येईल, अशी चिन्हे आहेत. (MSRTC Ticket Concession)
(हेही वाचा – State Legislative Council Elections : विधानसभेतील सात आमदार मतदार का झाले कमी?)
‘अमृत ज्येष्ठ नागरिक’मुळे मिळाले १७९९ कोटी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वर्षावरील ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत शासनाने देऊ केली. 26 ऑगस्ट 2023 पासून ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ (concession to senior citizens ) या नावाने ही योजना एसटीने सुरू केली. योजना सुरू झाल्यापासून 31 मे २०२४ पर्यंत या योजनेअंतर्गत ३४ कोटी ९९ लाख २१ हजार ३०२ लाभार्थीनी मोफत प्रवास केला असून त्याची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून राज्य शासनाने एसटीला १७९९ कोटी ३६ लाख ७० हजार रुपये दिले आहेत. सध्या दरमहा सुमारे २ कोटी २५ लाख लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असून प्रतिपूर्ती रक्कम म्हणून एसटीच्या महसूलात दरमहा सुमारे १२५ कोटी रुपये जमा होत आहेत.
‘महिला सन्मान योजना’मुळे मिळाले ७२ कोटी
२०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून प्रवास करतांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचे जाहीर केले. ही योजना १७ मार्च २०२३ पासून एसटीने ‘महिला सन्मान योजना’ (concession to Women) या नावाने सुरू केली. योजना सुरू झाल्या पासून ३१ मे २०२५ अखेर या योजनेअंतर्गत ७२ कोटी ७६ लाख ११ हजार ५७६ लाभार्थीनी ५० टक्के सवलतीच्या दरामध्ये प्रवास केला आहे. याची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून शासनाने एसटीला तब्बल २०९४ कोटी ५१ लाख ७० हजार रुपये दिले आहेत. सध्या राज्य शासन दरमहा सरासरी १८० कोटी रुपये एसटीला देत आहे. (MSRTC Ticket Concession)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community