मुंबई-गोवा ‘शिवशाही’ सेवा बंद! ९ दिवसात सव्वा चार लाखांहून अधिक उत्पन्न

डिसेंबरमध्ये बहुतांश नागरिक गोव्याची वाट धरतात. प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीमुळे अनेकदा ट्रेनचे तिकीट उपलब्ध होत नाही तर खासगी ट्रॅव्हल्स अधिक भाडे आकारतात. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते पणजी या मार्गावर वातानुकूलित एसटी सेवा सुरु केली.

( हेही वाचा : महत्त्वाची बातमी; पोलादपूर- महाबळेश्वरला जोडणारा ‘हा’ घाट 4 जानेवारीला राहणार बंद)

सुट्ट्यांचा कालावधी संपल्याने शिवशाही सेवा बंद 

नववर्षाच्या सुट्टीनिमित्त मुंबई-पणजी या मार्गावर शिवशाही सेवा सुरू करण्यात आली होती. या बसने गेल्या आठवडाभरात सव्वाचार लाखांहून अधिक उत्पन्न मिळवले. २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीतमध्ये एसटी प्रवाशांना शिवशाहीने दर्जेदार सेवा दिली आहे. सध्या सुट्ट्यांचा कालावधी संपल्यामुळे नागरिक पुन्हा एकदा दैनंदिन कामांकडे वळले आहेत. यामुळेच मंगळवारपासून मुंबई-पणजी या मार्गावरील शिवशाही सेवा बंद करण्यात आली आहे. एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

कोकण-गोवा पर्यटनाकडे कल 

डिसेंबर महिन्यात यंदाही नागरिकांचा कोकण- गोवा पर्यटनाकडे कल होता. खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे अधिक असल्याने एसटीची शिवशाही सेवा नागरिकांना फायदेशीर ठरली. परंतु आता सुट्ट्यांचा कालावधी संपल्याने एसटीने ही सेवा बंद केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here