मुंबई ते गोवा मार्गावर ‘शिवशाही’ प्रवास! एसटी महामंडळाकडून प्रवाशांना नववर्षाचे गिफ्ट…

156

एसटी महामंडळाने मुंबई ते गोवा मार्गावर एसी शिवशाही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचे बहुतांश नागरिक सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कोकण, गोव्यामधील पर्यटनस्थळांना भेट देतात अशावेळी नागरिकांना खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो किंवा ट्रेनचे आरक्षण करावे लागते. परंतु आता एसटी महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रवाशांना दिलासा दिला आहे. प्रवाशांना १ हजार २४५ रुपयांमध्ये मुंबईहूर पणजी प्रवास करता येणार आहे. ही सेवा शुक्रवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे नाताळ, नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला जाणाऱ्या नागरिकांना या एसीबसमधून आरामदायी प्रवास करता येणार आहे.

( हेही वाचा : ST बॅंकेची पदभरती रखडली; ‘हे’ आहे कारण)

नववर्षाचे गिफ्ट 

लागोपाठ सुट्या आल्यामुळे आणि विशेषत: नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी नववर्ष साजरे करण्याचे बेत आखले आहेत. यात कोकण-गोव्याला प्राधान्य आहे. यामुळे प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मुंबई ते पणजी मार्गावर एसटी महामंडळाने शिवशाही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या मुंबई-गोवा मार्गावर गोवा राज्य परिवहन महामंडळाची ‘कदंब’ ही सेवा सुरू असून, या बसचे भाडे १ हजार २५० रुपये आहे. या मार्गावर खासगी बसचे भाडे साधारण दीड हजार आहे. येत्या आठवड्यात खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे दर २ ते अडीच हजार होण्याची शक्यता आहे. म्हणूनच प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने शिवशाहीचा आरामदायी प्रवास उपलब्ध सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे आरक्षण प्रवासी मोबाईलवरून महामंडळाच्या MSRTC APP द्वारे सुद्धा करू शकतात अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.

अशी असणार सेवा

  • भाडे – १ हजार २४५ रुपये
  • थांबे – पनवेल, महाड, चिपळूण, राजापूर, कणकवली, सावंतवाडी
  • बस प्रकार – वातानुकूलित शिवशाही
  • सेवा सुरु होण्याचा दिनांक – २३ डिसेंबर २०२२
  • कुठून सुटणार – मुंबई सेंट्रलहून दुपारी ४.३० वाजता सुटणार
  • पोहोचणार – पणजीला सकाळी ७ वाजता पोहोचेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.